Top 40+ सर्व सण / शुभकार्य / पूजेला चालणारे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Hindu Festivals & Pooja

कोणत्याही सण / शुभकार्य / पूजेसाठीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Festivals & Pooja / Puja

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

लग्नानंतर किमान वर्षभर तरी प्रत्येक सण – समारंभाला उखाणे घेतल्याशिवाय तुमची सुटका नाही. आज काय तर सत्यनारायणाची पूजा, उद्या वटसावित्रीची, आणि परवा हळदी कुंकू …  अरे देवा… आता सारखे सारखे एवढे उखाणे पाठ तरी कसे करायचे?

बरं, नुसत्या सणासुदीलाच नाही, तर अगदी नातेवाईकांच्या घरी जोडीने भेटायला गेलं तरीही मुद्दाम चिडवण्यासाठी घास भरवण्याचा आणि त्यायोगाने नाव घ्यायचा  आग्रहही आलाच. आता आयत्या वेळी उखाणे सुचणार तरी कसे?

आणि मग तुमच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा बघून फिदी-फिदी हसणारी मंडळीही काही कमी नाहीत! मग अश्या वेळी करायचे तरी काय?

तुम्हीसुद्धा निरनिराळ्या दिवसांसाठी निरनिराळे उखाणे पाठ करून हैराण झाला आहेत का? मग सादर आहेत, खास तुमच्यासाठी, वर्षभर कोणत्याही पूजेला तसेच सण – समारंभाला घेता येतील असे उखाणे. आता पाठांतराचे NO TENSION!

हे उखाणे कसे घ्याल?

स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात.

नेहमीच्या उखाण्यांमध्ये फक्त एकच जागा रिकामी असते, ती म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या नावाची.

पण सर्व प्रकारच्या पूजा आणि सण -समारंभाला चालणाऱ्या या उखाण्यांमध्ये तुम्हाला २ ठिकाणी रिकाम्या जागा दिसतील. एका ठिकाणी तुमच्या जोडीदाराचे नाव आणि दुसऱ्या ठिकाणी येईल त्या सोहळ्याचे नाव.

म्हणजे, जर तुमच्याकडे मंगळागौर असेल तर तुम्ही म्हणाल,

(जोडीदाराचे नाव) चे  नाव घेते/घेतो, मंगळागौरीच्या दिवशी! 

आता पुढच्या वेळी, जर तुमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असेल, तर तुम्ही तोच उखाणा परत घेऊ शकता. फक्त या वेळी तुम्हाला म्हणावे लागेल…

(जोडीदाराचे नाव) रावांचे नाव घेते/घेतो, सत्यनारायण पूजेच्या दिवशी! 

कळलं? अगदी सोप्पं आहे ना?

आता तुम्ही तुम्हाला आवडलेले २-३ निवडक उखाणे पाठ करा, आणि प्रत्येक वेळी तेच उखाणे फक्त सोहळ्याचे नाव बदलून आलटून पालटून घ्या.

चुकून नवऱ्याचे नाव मात्र बदलू नका हं! मग मात्र गडबड होईल.

अहो चिडू नका…मस्करी केली थोडीशी.

चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


सर्व सण / शुभकार्य / पूजेला चालणारे मराठी उखाणे l Marathi Ukhane for Hindu Festivals and Pooja (Haldi Kunku, Gudi Padwa, Satyanarayan Puja etc.)

#1

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

मोत्यांची माळ, सोन्याचा साज…
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

आला आला __चा, सण हा मोठा…
__राव असताना, नाही आनंदाला तोटा  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी …
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

__ची पूजा, मनोभावे करते…
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

__पुढे लावली, समईची जोडी… 
__ मुळे आली, आयुष्याला गोडी  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

__च्या पुढे, फुलांचे सडे…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

__च्या समोर, ठेवले केशरी पेढे…
__रावांचे  नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट…
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading