Top 26+ नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Newly Married Couple

नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Newly Married Couple

नमस्कार मित्रमंडळींनो,

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.

पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मराठी उखाणे l Marathi Ukhane for Newly Married Couple (Post Wedding)


पुरुषांसाठीचे उखाणे | Marathi Ukhane For Men

#1

नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून… 
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून… 
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास
___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात… 
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#6

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे…
__च्या येण्याने, भाग्य उजळले माझे

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

परातीत परात, चांदीची परात…
(माहेरचे आडनाव) ची लेक आणली, मी (सासरचे आडनाव) च्या घरात.

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

1 thought on “Top 26+ नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Newly Married Couple”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading