Top 27+ अफलातून खट्याळ, विनोदी चावट मराठी उखाणे l Best Funny Chavat Marathi Ukhane for Party.

अफलातून खट्याळ, विनोदी बेस्ट मराठी उखाणे l Best Funny Marathi Ukhane for Gatari and Party

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर मित्रमंडळींना पार्टी तर द्यावीच लागणार! आणि मग तुम्हाला चिडवण्यासाठी खास उखाण्यांचा आग्रहही होणारच!

मग अशा मौजमजेच्या वातावरणात तुम्ही ते नेहमीचे Traditional आणि Serious उखाणे घेणार? अजिबात नाही.

अश्या वेळी उखाणेही हलके फुलकेच हवेत, सगळ्यांना हसवणारे. हो ना?

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी १००% हशा पिकवणारे गटारी, पार्टीची मजा वाढवणारे धमाल गंमतीदार चावट उखाणे. सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवा आणि पार्टीचे रॉकस्टार बना.

लक्षात ठेवा, हे उखाणे मित्रमंडळी किंवा तुमच्या वयाच्या मनमिळाऊ नातेवाईकांसमोर घेण्यासाठी आहेत. लग्नासारख्या पारंपरिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेण्यासाठी मुळीच नाहीत.

आणि हो, तुमचा जोडीदार जर खूपच गंभीर स्वभावाचा असेल, तर त्याच्या परवानगीनेच हे उखाणे घ्या बरं का. नाहीतर मस्करी ची कुस्करी व्हायची!

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


विनोदी चावट मराठी उखाणे l Funny and Chavat ( Naughty) Marathi Ukhane for Party

#1

गुलाबाचे फूल, वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते, __ चे गुलूगुलू

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड  गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड. 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी…
__शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …
___  एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


1 thought on “Top 27+ अफलातून खट्याळ, विनोदी चावट मराठी उखाणे l Best Funny Chavat Marathi Ukhane for Party.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading