Top 9+ नेते, मंत्री यांसाठीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Politicians During Maharashtra and BMC Elections/ Results / Voting

नेते, मंत्री यांसाठीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Politicians

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

नव्यानेच रुजू झालेला नगरसेवक असो, वा निवडणुकीला उभे राहिलेला उमेदवार, नव्या दमाचा युवा नेता असो, किंवा राजकारणात मुरलेलं एखादं बडं प्रस्थ, कौतुक केलेलं कोणाला बरे आवडत नाही?

आणि जर घरच्या ‘होम मिनिस्टर’ नी मोठ्या प्रेमानं उखाणा घेत घेत, नवऱ्याविषयी वाटणारा अभिमान व्यक्त केला तर मग पतिदेवांचाही रुबाब चार-चौघांमध्ये वाढणारच, हो ना?

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत, नेते, मंत्री, आमदार, खासदार किंवा निवडणुकीच्या काळात उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी साजेसे मराठी उखाणे.

निवडणुकीच्या काळात तर हे उखाणे नक्कीच मतं खेचून आणतील.

आणि हो, हे उखाणे नुसतेच वाचू नका, आवडले तर आम्हाला खालील comment box मध्ये बहुमताने पासही करा.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं? चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


नेते, मंत्री, निवडणूक यांसाठीचे बेस्ट मराठी उखाणे l Marathi Ukhane for Politicians During Maharashtra and BMC Elections/ Results / Voting

#1

अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही…
जिथे माझ्या ___रावांचं नाव नाही !!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री… 
___झाली, आज माझी गृहमंत्री

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

__ ला जाताना लागतो, __ चा घाट…
अख्ख्या गावात नाही, __ रावांसारखा थाट

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

सावन का महीना पवन करे शोर…
मतदान करा __रावांना, बाकी सगळे आहेत चोर !!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

__रावांचे सुख हाच माझा अलंकार…
येत्या निवडणुकीत होवोत, सर्व स्वप्ने साकार

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

कलियुगात अवतरली, सत्य व अहिंसेची मूर्ती… 
__रावांची वाढो, सर्वदूर किर्ती

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

यंदाच्या निवडणुकीत, आमच्या __ पक्षाचा सूर…
__राव म्हटल्यावर येणार, मतांचा महापूर 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

अत्तराचा सुगंध, दरवळला चहूकडे…
__रावांची किर्ती, पसरू दे सगळीकडे  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

भल्याभल्यांचे ज्यांच्यशिवाय, हलत नाही पान… 
अशा __रावांना मिळो, चोहीकडे मान 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


नमस्कार मंडळी!

तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Like आणि Share करा बरं !

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे.

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

आणि हो… तुम्ही आमचे सगळे उखाणे वाचलेत का? नाही? मग आमच्या पोतडीतील सर्व उखाण्यांचा संग्रह एकाच वेळी बघण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading