*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.
नमस्कार मित्रांनो,
बायकोने उखाणा घेतला की ‘राव’ ही पदवी ऐकून मनाला क्षणिक का होईना, खूप बरे वाटते. एकदम मोठा माणूस झाल्यासारखे वाटते. हो ना?
पण मग तुम्हाला कोणी तुमच्या प्रेयसी / बायकोसाठी उखाणा घ्यायला सांगितलं तर तुमची बोबडी का बरं वळते ?
पुरुषांचा आणि उखाण्यांचा बऱ्याचदा ३६ चा आकडा असतो. उखाणे? नको रे बाबा… किंवा, अरे उखाणे बायकांसाठी असतात. मर्द मराठ्यांसाठी नाहीत…अशा सबबी पुढे करून नाव घेणं टाळण्यात तर तुम्ही एकदम उस्ताद!
आणि मग प्रेयसी / बायकोने खूपच आग्रह केला तर, “मी तुझ्यासाठी आकाशातून एक वेळ चंद्र-तारे तोडून आणू शकतो… पण हे उखाणे घ्यायला मात्र मला नको सांगूस” असे बोलून मोकळे होण्यातही तुम्ही पटाईत.
काय हे! तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर मस्त गोड हसू फुलवण्यासाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत?
आता तुमची सुद्धा काय चूक म्हणा, तुम्हाला उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे!
आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना?
म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, खास पुरुषांसाठी पाठ करायला अगदी सोपे, छोटे असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त मराठी उखाणे.
आता उखाणे न घेण्याच्या सबबींना करा राम राम!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!
नवरदेव / पुरुषांसाठीचे मराठी उखाणे l Marathi Ukhane for Groom / Husband / Male / Boys / Men
#1
एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#2
निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#3
आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#4
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा …
__ च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#5
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#6
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#7
एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#8
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#9
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
#10
लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !
या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा
ekdam chhan vaatale
thank lot
चांगले मराठी उखाणे आहे या वेबसाईट वर
Click Here is working all
खूप दिवसापासून मी उखाणे शोधात होते, आज google वरती मला आपली ही वेबसाइट सापडली. मी सगळे उखाणे वाचले. मला हे उखाणे खूप आवडले. मी अजून तुमच्या वेबसाईट वरचे दुसरे उखाणे पण वाचणार आहे. या मध्ये अजून उखाणे please add करा.
खूप चांगले व नवीन उखाणे आहेत तुमचे. वाचताना मज्जा आली.
Pingback: Top Latest 60+ Marathi Ukhane For Male
Pingback: Top Latest 60+ Marathi Ukhane For Husband: नवरदेव / पुरुषांसाठीचे छोटे सोपे बेस्ट मराठी उखाणे: 2023
Ek no.👌👌👌❤️