Top 60+ नवरी/ स्त्रियांसाठीचे बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane for Navri / Bride / Female / women / Girls

नवरी / वधू / बायको साठीचे बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane for Bride / Women / Wife

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मैत्रिणींनो,

आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


नवरी/ स्त्रियांसाठीचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Navri / Bride / Female / women / Girls

#1

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध…
___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

दोन जीवांचे मिलन, जणू शतजन्मांच्या गाठी…
__ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहासाठी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …
__ रावांचे नाव हळूच ओठी येई

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण…
__ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी…
__रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा…
__ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा…
__ रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

हिरव्या हिरव्या साडीचा, पिवळा काठ जरतारी…
__ रावांचे नाव घेताच येई, चेहऱ्यावर तरतरी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

पैठणीवर शोभे, नाजूक मोरांची जोडी…
__मुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


1 thought on “Top 60+ नवरी/ स्त्रियांसाठीचे बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane for Navri / Bride / Female / women / Girls”

  1. हे उखाणे छान आहेत. हे खूप सगळे उखाणे आहेत. यामधले बरेच उखाणे मी आजपर्यंत कधी वाचले नवते. धन्यवाद एवढ्या सगळ्या उखाण्यासाठी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading