Top 13+ बेस्ट गावरान मराठी उखाणे l Best Marathi Gavran / Gavthi Ukhane (based on Village)

बेस्ट गावरान मराठी उखाणे l Best Marathi Ukhane based on Village

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

गावच्या मातीची गोष्टच न्यारी. त्या चिंचा – ती बोरं, ती कौलारू घरं, घरासमोरची तुळस, मातीच्या माठामधले गार गार पाणी, वडाच्या झाडावर खेळलेल्या सूर-पारंब्या आणि त्या टुमदार घरातल्या गोड आठवणी कोण बरं विसरू शकेल?

म्हणूनच तर शिक्षण व उद्योग-धंद्यांसाठी शहरात स्थायिक होऊन बरीच वर्ष लोटली तरी बऱ्याचदा आपली नाळ मात्र आपल्या मूळ गावाशीच जोडलेली राहते. 

मग उखाण्यांमधूनही तुमचं हे प्रेम दिसू द्या ना.

आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी गावच्या मातीशी नातं सांगणारे उखाणे.

तुमच्या जोडीदार आणि गावावरचं प्रेम एकत्र व्यक्त करण्याची ही नामी संधी अजिबात चुकवू नका बरं का!

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.  


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


गावरान मराठी उखाणे l Marathi Gavran / Gavthi / Village Ukhane

#1

गार गार माठामधले, पाणी ताजे ताजे…
__राव माझ्या, मनाचे झाले राजे

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

इंग्लिश मध्ये चंद्राला, म्हणतात ना हो मून …
__रावांचं  नाव घेते, __ ची सून

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

कॉलेज मध्ये असताना, फिरवल्या कित्ती पोरी …
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
__ च नाव घेते, तोंड आठवून __चे!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

पांढरेशुभ्र धोतर, केशरी फेटा…
__रावांपुढे वाटेल, पहिलवानही छोटा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

मातीत माती, माझ्या गावातली माती…
__रावांच्या नावाचे, कुंकू लावले माथी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

पंढरी आहे, माऊलीचे स्थान…
__रावांना आहे, गावी खूपच मान

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

तुमच्या आशीर्वादाने सजला, __चा सोहळा…
__रावांचे नाव ऐकायला, गाव झालंय गोळा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

__ ला जाताना लागतो, __ चा घाट…
अख्ख्या गावात नाही, __ रावांसारखा थाट

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading