Top 41+ नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे l Best Modern Marathi Ukhane for Young Generation

नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे l Best Modern Marathi Ukhane for Young Generation

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच. 

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ? 

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया. 


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


नव्या पिढीचे मॉडर्न मराठी उखाणे l Smart Modern Marathi Ukhane for Young Generation

#1

प्रपोझ केलं देऊन, गुलाबाची फुलं…
___शी लग्न झालंय पण, एवढ्यात नाही हा मुलं!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा…
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला…
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल…
__ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

रोज ___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…
मग उखाणा घेताना ___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
___आहे, माझ्या Life चा Server

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते…
__च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून… 
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading