Top 16+ श्रावण व मंगळागौरीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Shravan & Mangalagaur

श्रावण व मंगळागौरीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Shravan & Mangalagaur

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


नमस्कार मित्रमंडळींनो,

हिंदू संस्कृतीत श्रावणाला खूप महत्त्व आहे. 

श्रावणी सोमवार, नाग पंचमी, नारळी पौर्णिमा, मंगळागौर असे बरेचसे सण, व्रतवैकल्य आणि पूजा याच महिन्यातल्या!

पण श्रावण म्हणजे फक्त उपास आणि पूजा नाहीत बरं का. श्रावण म्हणजे पावसाचा सुखद शिडकावा. श्रावणधारांनी तृप्त झालेली धरित्री आणि मखमली हिरवाईने बहरलेला निसर्ग किती मनमोहक वाटतो नाही का?

म्हणूनच सादर करत आहोत, खास श्रावणात घेता येतील असे, पावसाळा तसेच मंगळागौरीचे खेळ व अन्य व्रतवैकल्यांना शोभतील असे सुंदर मराठी उखाणे

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं? चला तर मग, उखाणे बघूया.


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


श्रावणाचे उखाणे | Marathi Ukhane for Shravan

#1

श्रावणात बरसतात, सरींवर सरी…
__ रावांचे  नाव घेते __ ही बावरी 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

श्रावणात येई, पावसाला जोर…
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा  

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

भर श्रावणात, पाऊस आला जोरात…
__रावांचे नाव घेते, __च्या घरात 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती…
__रावांच्या संसारात, मिळो सुखशांती

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

श्रावणात आकाशात, कडकडतात विजा… 
__रावांसोबत करते, __ची पूजा

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

मेघ मल्हार रंगातच, श्रावणसर कोसळते…
__ च्या नावाने माझे, जीवनपुष्प बहरते

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती…
___राव आहेत, खूपच प्रेमळ पती

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

श्रावणामध्ये येते, सुंदर श्रावणधारा…
___रावांचे नाव घेते, (पूजेचे नाव) आहे घरा.

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#10

श्रावण महिन्यात, सृष्टी होते हिरवी…
____रावांची गाते, मी उखाण्यातून थोरवी

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


1 thought on “Top 16+ श्रावण व मंगळागौरीचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Shravan & Mangalagaur”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading